आपला जिल्हा आपली बातमीवाशिम जिल्हा विशेष

कार्यसम्राट आमदार श्याम भाऊ खोडे यांचा यशस्वी पुढाकार

  वाशीम- चिखली खुर्द ते आसोला फाटा रस्ता डांबरीकरणाला होणार सुरुवात

कार्यसम्राट आमदार श्याम भाऊ खोडे यांचा यशस्वी पुढाकार

 

  वाशीम- चिखली खुर्द ते आसोला फाटा रस्ता डांबरीकरणाला होणार सुरुवात

वाशीम : दि. २६ जवळपास दिड वर्षांपासून रखडलेल्या वाशीम – चिखली खुर्द ते आसोला फाटा ( शेलुबाजार रस्ता ) बाकी असलेल्या डांबरीकरण कामाला येत्या 2 दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. हे रखडलेले काम पूर्ण होऊन त्या भागातील हजारो नागरिकांना दळणवळणास सोयीचे व्हावे म्हणून वाशीम – मंगरूळपीर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्याम भाऊ खोडे यांनी विशेष लक्ष घालून पाठपुरावा केला. संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांशी यशस्वी संवाद केला. कंत्राटदारास त्यांचे प्रलंबित देयके ( बिल ) काढून देण्याची हमी स्वतः आमदार खोडे साहेबांनी घेतली. त्यामुळे सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करुन पूर्ण करण्याचा शब्द कंत्राटदाराने दिला आहे. 

   आमदार खोडे साहेबांच्या या धडाडीच्या भूमिकेचं सर्वत्र स्वागत होत असून त्यांच्यामुळेच या रखडलेल्या कामास सुरूवात होणार आहे.

दरम्यान या रस्त्यासाठीच ठिय्या आंदोलनाचा इशारा सुद्धा गट ग्राम पंचायत चिखली खुर्द च्या सरपंच सौ. संध्या गणेशराव अढाव व उपसरपंच बाळूभाऊ बर्डे, संतोष सुर्वे यांनी गावकऱ्यांच्या वतीने दिला होता. आज ह्याच बाबतीत निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी व पाठपुरावा करण्याची विनंती करण्यासाठी चिखली, कामठवाडा व वाघजाळी येथील असंख्य मंडळी आमदार खोडे साहेबांना भेटली. आमदार खोडे यांनी लगेच संबंधित ठेकेदार यांना बोलावून यशस्वी प्रयत्न करीत रस्ता डांबरीकरण करण्याचा आग्रह धरला. त्याचीच फलश्रुती म्हणून येत्या 2 दिवसांमध्ये कामाला सुरुवात करून डांबरीकरण पूर्ण करणार असल्याचे संबंधित कंत्राटदाराने सांगितले. आमदार खोडे यांच्या या धडाडीच्या कामाचे परिसरासह सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button