परभणी

 कारवाईची भीतीच संपली ! पुर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळुचा उपसा

 कारवाईची भीतीच संपली ! पुर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळुचा उपसा

परभणी (गजानन साबळे) :- तालुक्यातील आलापुर पांढरी या गावालगत जात असलेल्या नदीपात्रातून रात्री बेरात्री मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा व वाहतूक जोरदारपणे सुरू आहे. पोलीस प्रशासन व महसूल विभागाने (revenue department) आलापुर पांढरी येथील वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी अशी मागणी परीसरातील ग्रामस्थांतून होत आहे.

आलापुर पांढरी परीसरात अवैध वाळू उपसा व वाहतूक

कारवाईची भीतीच संपली !

आलापुर पांढरी परीसरात अवैध वाळू उपसा व वाहतूक

परभणी तालुक्यातील आलापुर या गावापासून जात असलेल्या नदीच्या पात्रात या ठिकाणी मंदीर परिसराच्या पाठीमागे या ठिकाणी कुठलेही टेंडर काढण्यात आलेले नसताना बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा व वाहतूक होत आहे. टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे वाळूची मोठ्या प्रमाणावर उपसा व वाहतूक सुरू आहे. आलापूर पांढरी या गावातील मंदीर परिसरात पाठीमागे नदीपात्रातू वाळुचा उपसा करून परभणी वसमत रोडवरील या राष्ट्रीय महामार्गावरून वाळू उपसा केलेले ओव्हरलोड टिपर धावतात. या रोडवर नेहमीच पोलिस अधिकारी, कर्मचारी व महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची या रोडवर नेहमीच रेलचेल असते, मात्र अवैध वाळू उपसा (illegal sand mining) करुन ओव्हरलोड सुसाट वेगाने जात वाळू वाहतूक करणारे टिपर दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

कारवाईची भीतीच संपली !

महसूल व पोलीस प्रशासनाने आलापुर पांढरी या गावालगतच्या जात नंदीच्या पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतूकीला सुट दिली आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. महसूल प्रशासनाकडून यावर ठोस कारवाई होत नसल्याने विभागाच्या संमतीने सुरू आहे कि काय? अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.जिल्हाधिकारी यानी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातून नागरीक मधुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button