हजार रुपयांची लाच स्विकारणारा पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात

पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारणारा पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात
Police Patil Bribe
परभणी/गंगाखेड (Police Patil Bribe) : चार पांदण रस्त्याच्या कामासाठी दिड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथील पोलीस पाटील व अन्य एका खाजगी इसमास लाचेच्या रकमेसह (Police Patil Bribe) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून शुक्रवार ४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोनपेठ तालुक्यातील वडगाव येथील पोलीस पाटील रामेश्वर बचाटे याने ग्रामपंचायतकडून सुरु असलेल्या चार पांदण रस्त्याच्या कामावर तक्रारदाराच्या हायवा ट्रॅक व त्यांच्या मामाकडील जेसीबीने मुरूम व विहिरीमधून निघालेला पाषाण दगड रस्त्यावर टाकून रस्त्याचे काम करीत असताना दि. २१ मार्च रोजी पोलीस पाटील रामेश्वर बचाटे यांनी तक्रारदारास भेटून तुमचे हायवा आणि जेसीबीने तुम्ही दोघे गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करीत आहात. तुम्ही मला प्रत्येकी ५००० रुपये प्रमाणे दोघांचे १०००० रुपये दर दिवशी द्या नाही तर ही माहिती मी पोलीस स्टेशन आणि तहसील ऑफिसला देईल. त्यामुळे तुमच्यावर गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल होईल असे म्हटल्याने व तक्रारदारांना पोलीस पाटील रामेश्वर बचाटे मागत असलेली (Police Patil Bribe) रक्कम लाच असल्याने ती देण्याची इच्छा नाही अशी तक्रार दि. २३ मार्च रोजी ४२ वर्षीय तक्रारदाराने लाच लुचपात प्रतिबंधक विभागाच्या परभणी येथील कार्यालयात दिली.
त्याच दिवशी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तेंव्हा पडताळणी कार्यवाहीमध्ये लोकसेवक पोलीस पाटील रामेश्वर बचाटे यांनी एकूण चार पांदण रस्त्याचे कामासाठी दीड लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती प्रथम ५० हजार रुपये आणि नंतर ७५ हजार रुपये असे १,२५,००० रुपयाची मागणी केली व लाचेची रक्कम खाजगी इसम वैजनाथ बचाटे यांचेकडे देण्यास सांगून लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविल्याने शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी खाजगी इसम वैजनाथ सुंदरराव बचाटे यांनी तक्रारदारांकडून लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता ५०,००० रुपये स्वतः स्विकारला त्यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेत लोकसेवक (Police Patil Bribe) पोलीस पाटील रामेश्वर काशिनाथ बचाटे यास देखील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
आरोपी लोकसेवक पोलीस पाटील रामेश्वर बचाटे याच्या अंगझडतीमध्ये एक मोबाईल व वैजनाथ सुंदरराव बचाटे यांच्या अंगझडतीमध्ये लाचेची रक्कम ५०,००० रुपये आणि १ मोबाईल फोन जप्त करून गुन्हा दाखल करण्यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ही (Police Patil Bribe) सापळा कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी विभागाचे पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर निलपत्रेवार, अंमलदार नामदेव आदमे, राम घुले, कल्याण नागरगोजे, चा.पो.ह. जनार्धन कदम, अनिल नरवाडे यांच्या पथकाने केली आहे. याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणीचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी हे करीत आहेत.