कृषी विषयकवाशिम जिल्हा विशेष

वाशिम बाजार समिती करणार अश्वगंधा शेतीचा प्रसार!

वाशिम बाजार समिती करणार अश्वगंधा शेतीचा प्रसार!

शेतकऱ्यांना अपारंपरिक पिकाकडे वळवून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती ने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत या अंतर्गत औषधी वनस्पती असलेल्या अश्वगंधा शेतीचा प्रसार करण्यासाठी निर्माघेण्यात आला आहे.आगामी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बियाणे उपलब्ध करून देण्यासह उत्पादित मालाची खरेदी केली जाणार आहे.पारंपरिक पिकांना अपेक्षित भाव न मिळणे आणि वाढता उत्पादन खर्च या मुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर वाशिम बाजार समितीने किनोव्हा, राजगिरा, चीया कस्तुरी भेंडी या सारख्या अपारंपरिक पिकाची खरेदी सुरू केली आहे.आता अश्वगंधा शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी समितीने निमज बाजार समितीचा अभ्यास केला असून, तश्याच धर्तीवर नवे उपक्रम राबविण्यात निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button