परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना लाचलुचपत विभागाची कारवाई

परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना लाचलुचपत विभागाची कारवाई
परभणी लाचलूचपत विभागाची कारवाई…!
परभणी (Kavita Navande arrested) : क्रीडा स्पर्धेचे देयक काढण्यासाठी दिड लाखाची लाच घेताना परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी (Kavita Navande arrested) कविता नावंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Parbhani District) गुरुवार २७ मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात परभणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदर कारवाई केली.
क्रीडा स्पर्धेचे देयक काढण्यासाठी मागितली लाच…!
या कारवाई बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मानवत येथील तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. क्रीडा स्पर्धेचे देयक काढण्यासाठी कविता नावंदे यांनी अडिच लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी एक लाख रुपये यापूर्वीच घेतले. तर उर्वरित दिड लाख रुपयांची रक्कम घेताना गुरुवार २७ मार्चला सापळा रचत (Kavita Navande arrested) कविता नावंदे यांना ताब्यात घेण्यात आले.
क्रीडा स्पर्धेचे देयक काढण्यासाठी मागितली लाच…!
पुढील कारवाईसाठी त्यांना (Parbhani District) नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.पथकाने त्यांच्या घराची देखील झडती घेतली असून या ठिकाणीही देखील घबाड मिळाल्याची माहिती आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे (Kavita Navande arrested) या वादग्रस्त ठरल्या आहेत.
या अगोदर त्यांची बिल काढण्यासाठी पैसे मागत असल्याची क्लिप सोशल मिडियावर वायरल झाली होती. कविता नावंदे (Kavita Navande arrested) यांचा मनमानी कारभार सुरू असून खेळाडूंना सुविधा दिल्या जात नाहीत, त्यांच्या गैरकारभाराची विभागीय चौकशी करुन त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी आ.डॉ. राहूल पाटील यांनी विधानसभेत केली होती.