ग्रंथालयाचे प्रश्न शासन दरबारी मांडणार आमदार अड.किरणराव सरनाईक

ग्रंथालयाचे प्रश्न शासन दरबारी मांडणार आमदार अड.किरणराव सरनाईक.
वाशिम :- दि २२/०३/२५ राजू पांढरे ( प्रतिनिधी)राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदान वाढ वर्ग बदल आणि नवीन ग्रंथालयाला मान्यता यासारख्या अनेक प्रकारच्या मागण्या प्रलंबित असून शासनाने बरेच वेळा आश्वासने देऊन सुद्धा ग्रंथालयांना समाधानकारक अनुदान वाढ न मिळाल्याने ग्रंथालयाचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करणार असे प्रतिपादन माननीय एडवोकेट किरण राव सरनाईक यांनी वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाच्या 21व्या वार्षिक अधिवेशन आणि अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे 24 वे वार्षिक अधिवेशन अशा संयुक्त कार्यक्रमात दिनांक 22 मार्च 2025 रोजी संपन्न झालेल्या वार्षिक अधिवेशन कार्यक्रमात उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी केले सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे जिल्हा ग्रंथालय संघ, आणि विभाग ग्रंथालय संघाचे एक दिवसीय वार्षिक अधिवेशन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालया चे प्रारगणात आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माननीय वर्गमित्र प्रभाकरराव घुगे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक माननीय सुनील हुसे, अमरावती विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक डॉ राजेश पाटील, यवतमाळच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय कवीता महाजन अकोल्याचे जिल्हा ग्रंथालयअधिकारी माननीय अतुल पाटील वानखडे वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय बालाजी कातकडे विभागीय ग्रंथालय निरीक्षक श्री गजानन कुरवाडे वाशिम जिल्ह्याचे ग्रंथालय निरीक्षक माननीय नरेश काळे त्याचप्रमाणे विभाग ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करून स्वागत गीतेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमानिमित्त माननीय आमदार ऍडव्होकेट किरणराव सरनाईक यांनी ग्रंथालयाच्या प्रश्नाबाबत आपले विचार व्यक्त केले,त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ग्रंथ मित्र प्रभाकर घुगे यांनी ग्रंथालयाच्या समस्या बाबत चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे त्यांनी अधिवेशनामध्ये ठरावाचे वाचन सुद्धा केले मराठवाडा विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक माननीय सुनील. हुसे यांनी ग्रंथालयाच्या बाबत विविध प्रकारचे अनुभव कथन केले त्याचप्रमाणे डॉक्टर राजेश पाटील यांनी ग्रंथालय व्यवस्थापनाबाबत चांगल्या प्रकारचे उदाहरण स ह मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय डॉक्टर सुरेश मडावी यवतमाळ जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय कविता महाजन अकोला जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय अतुल पाटील वानखडे, प्राध्यापक कमलेश खिल्लारे बुलढाणा यांची प्रामुख्याने भाषणे झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय धांडे यांनी केले तर प्रास्ताविक अमरावती विभागाचे प्रमुख कार्य ,डॉक्टर सिताराम नालेगावकर यांनी केले आभार मानले वाशिम जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब काळे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुकिंदा महाले ,मनोज काळे सुभाष नालेगावकर ,कपिल कांबळे, शिल दीपक खंडारे , पुरुषोत्तम गंगावणे , प्रताप मोरे,, सचिन दळवी कपिल कांबळे बिट्टू भालेराव, विलास कांबळे बंडू इंगोले सुखदेव लबडे राजीव पांढरे सिद्धार्थ लबडे, कल्याणी धर्माधिकारी इत्यादीनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाला अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडा णा जिल्ह्यातील ग्रंथालयाची बहुसंख्येने प्रतिनिधी हजर होते.