बार्शी तालुक्यातील लाडोळे गावचा सुपुत्र समाधान रामभाऊ गुंड यांची आज दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वर्ग १ , प्रथम न्यायदंडाधिकारी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली निवड

सदानंद महाराजांच्या पावन भुमीतील, बार्शी तालुक्यातील लाडोळे गावचा सुपुत्र समाधान रामभाऊ गुंड यांची आज दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वर्ग १ , प्रथम न्यायदंडाधिकारी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड केली*
चिंचगांव प्रतिनिधी.नागेश पाटील
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाधानने जिद्द, चिकाटीने, आत्मविश्वासाने हे समाधानकारक यश संपादित केले. गुंड परिवार विशेषतः आदरणीय अशोक गुंड यांचे समाधानला सातत्याने मिळणारे सकारात्मक पाठबळ हे यशासाठी अनमोलं ठरले.
न्यायाधीश व्हायचचं हा समाधानचा निश्चय आज सदानंद महाराजांनी पुर्ण केला. सत्य संकल्पाचा दाता नारायण हे संतवचन पुर्ण झाले. आजची ही गोड वार्ता ऐकून मनोमन समाधान वाटले. २००३ ते २००५ या कालावधीत पंचायत समिती बार्शी ज्ञानसरिता मंचाच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत समाधान इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीत असताना तालुक्यात प्रथम होता. या यशाबद्ल मा.आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या हस्ते त्यावेळी समाधानचा विशेष सत्कार पंचायत समितीच्या वतीने झाला होता. वर्गशिक्षक म्हणून मी सोप्या विषयावर स्पर्धेसाठी लिहून दिलेले भाषण समाधान दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी परिपाठात आपल्या स्पष्ट, खणखणीत आवाजात, नैसर्गिक पद्धतीने व्यक्त करत असे. आजही याचा विशेष आनंद आहे…
समाधानला पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा…